चंद्रपूर,
cbse-10th-results : सीबीएसईने बुधवारी जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात येथील बीजेएम कार्मेल अॅकेडमी शाळेचा श्लोक मुधोळकर याने 98.80 टक्के, चांदा पब्लीक स्कूलची विद्यार्थीनी नाविन्या बत्तूलवार हिने 98.20 टक्के, तर महर्षी विद्या मंदिरची विद्यार्थीनी आर्यही पडेवार हिने 98.4 टक्के गुण प्राप्त केले आहे.

तसेच महर्षी विद्या मंदिरची विद्यार्थीनी समृद्ध कालिंगकर हिने (96.2), दुर्वास रामटेके (95.4), तर देवांश गोजे (95) यशस्वी मानुसमारे (94.6), स्वयंम रोकमवार (94.6 टक्के),. एशिका उपगनलावर (94.2), निषाद गनुरे (94.2), रुद्रांश डोये (93.8), अनुष्का झेडे (93.6), अवधूत पद्मावर (93.6), वेद खलोरे (93), ऋत्त्वा कोटगिरवार (92.8), शौर्य बुद्धवार (92.6), इशिता सिंग (92.5), मनू त्रिपाठी (92.4), अधिप वांढरे (92.4), पलक लिंगे (92.2), विस्मिट डेथे (92), कृष्णा मदुरवार (91.8), सिद्धांत सेडामे (91.8), गायत्री धवास (91.6), तनुष्का गहूकर (91.4 टक्के), प्रतीक्षा सिंह (91.4), काव्या गाडगे (91.2), अरुश्री आत्राम (90.6), हृदयी साठे (90.6), श्लोक मनलवार (90.2), अभिषेक साहू (90.2), गोजिरी मुडे (90) श्रीजा चौधरी (90 टक्के) या शाळेत अव्वल आल्या आहेत.
तर येथील बजाज विद्या भवन शाळेच्या संस्कृती तळोधीकर (95), नैतिक चावलढाल (92.4), कार्तिक उरकुडे (92), अवनी लाकडे (92), अर्णव शिंदे (91) यांनीही घवघवीत यश मिळविले आहे.