मुख्याधिकारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याची तक्रार

रिकाम्या खुर्चीला घातला हार

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
मानोरा,
complaint about chief officer शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेले नगरपंचायत प्रशासनाचे मुख्याधिकारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने विकास कामे खोळंबत असल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या मुख्याधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला नगरपंचायत पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला संताप व्यक्त केला.
 
 
complaint about chief officer
 
गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुख्याधिकारी म्हणून उमेश राठोड यांची नेमणूक झालेली आहे. मुख्याधिकारी राठोड हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत, त्यांची येण्या जाण्याची वेळ निश्चित नाही, ते कार्यालयात आले तर नागरिकांशी संवाद साधत नाहीत ज्यामुळे विकास कामांचा खोळंबा झाला असल्याची तक्रार नगरपंचायत पदाधिकारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.complaint about chief officer नगरपंचायत हद्दीत मंजूर घरकुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मुख्याधिकारी देत नसल्यामुळे हक्काच्या घरापासून पात्र नागरिक वंचित राहून घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूला हरताळ फासल्या जात आहे. रुजू झाल्यापासून मुख्याधिकारी राठोड हे निष्क्रिय राहत असल्यामुळे विकास कामांना खिळ बसत आहे ज्यामुळे आवश्यक भौतिक सुविधांपासून नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वंचित राहावे लागत असल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर अतिक रहमान खान, इरफान शाह जमील शाह, संजय नारायण भोरकडे, हेमेंद्र ठाकरे, मो. सोहेल अ. गणि अन्सारी, अमित सोनीवाल, गोपाल पिपळकर, गणेश प्रल्हाद वाघमारे, मोहम्मद अकिब पोपटे, शेख सुलेमान शेख तुराव, विजय वजीर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
नगरपंचायत प्रशासनाचा कारभार निष्पक्ष व्हावा, शासनाच्या कल्याणकारी योजना राबविण्याचा प्रामाणिक हेतू आहे. जनहिताच्या कामात कुठेही कामचुकार पणा केला नाही. शासनाच्या योजनेचा लाभ पात्र लोकांना मिळावा यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करत आहो. मी कार्यालयीन कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याच्या प्रतिक्रिया मुख्याधिकारी उमेश राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.