सायबर गुन्हेगाराने घातला रेल्वे अधिकाऱ्याला 10 लाखांनी गंडा

- यूट्यूब जाहिरातीच्या आमिषाला बळी

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
cyber criminal यूट्यूबवरील बनावट शेअर मार्केट जाहिरातीच्या आमिषाला बळी पडून रेल्वे लाेकाे पायलटने सुमारे 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, काही दिवसांतच सायबर गुन्हेगाराने फसवणूक केल्याचे समाेर आले. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली असून 8 एप्रिल राेजी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 

cyber criminal 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी राेजी सायंकाळी सुमारे 5 वाजता लाेकाे पायलट हे यूट्यूब पाहत असताना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचा दावा करणारी जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवर क्लिक करताच विनीत सहानी आणि मनीष खंडेलवाल अशी नावे सांगणाऱ्या दाेन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. दाेघांनी स्वतःला शेअर ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून माेठ्या नफफ्याचे आमिष दाखवले.cyber criminal विश्वास संपादन करून त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण 10 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र रक्कम हस्तांतरित हाेताच आराेपींनी अचानक संपर्क ताेडून फरार झाले. या प्रकरणात सायबर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून दाेन्ही आराेपी अद्याप फरार आहेत. पाेलिस त्यांच्या माेबाईल नंबरसह इतर तांत्रिक माहितीच्या आधारे शाेध घेत आहेत.