अनिल कांबळे
नागपूर,
वैवाहिक जीवनाची वाताहत: न्यायालयात वाढतायेत घटस्फोटची प्रकरणे
married life divorce cases लग्न झाल्यानंतर काहीच महिन्यांत एकमेकांशी पटत नसल्याच्या कारणावरुन थेट घटस्फोट घेण्याचा निर्णय दाम्पत्य घेत आहेत. तसेच कुटुंबाचा अतिहस्तक्षेसुद्धा घटस्फोटचे कारण बनत आहेत. गेल्या तीन वर्षांत 9 हजार 323 दाम्पत्यांनी कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी दावे दाखल केले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्यामुळे समाज व्यवस्थेला खिंडार पडत असल्याने चिंता वाढत आहे.
कुटुंबाच्या पसंतीने लग्न केल्यानंतर माहेर आणि सासरच्या मंडळींचा नवदाम्पत्यांच्या संसारात हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे माहेरची मंडळी मुलीला सल्ला देत संसार करण्यासाठी प्राेत्साहन देते तर सासरची मंडळी विवाहितेवर हक्क दाखवत तिचा स्वाभीमान जपण्यात मागे पडत आहेत. यासाेबतच पती-पत्नीमधील संवाद कमी हाेत असल्याने मनात दुरावा निर्माण हाेत आहे. या सर्व कारणामुळे काैटुंबिक कलह वाढत आहेत. कुटुंबियांशी मतभेद वाढत असल्यामुळे पती-पत्नींमध्ये वाद आणि भांडणे हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या तीन वर्षांची घटस्फोटाची आकडेवारी धक्कादायक आहेत. दिवसेंदिवस घटस्फोटाचे दावे वाढत असून त्यासाठी किरकाेळ कारणे जबाबदार असल्याचे समाेर आले आहे. वर्ष 2023 मध्ये 2540 दाम्पत्यांनी कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी दावे दाखल केले हाेते. तर वर्ष 2024 मध्ये 2596 दाम्पत्यांनी घटस्ाेट घेण्याचा निर्णय घेतला हाेता. 2025 मध्ये घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्यांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ झाली असून 3952 दाम्पत्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. बदलती जीवनशैली, आर्थिक स्वातंत्र्य, वैवाहिक अपेक्षांतील बदल आणि काैटुंबिक तणाव ही या वाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.विवाह टिकवण्याबाबतचा दृष्टिकाेन बदलत असून, तणावग्रस्त नातेसंबंधातून बाहेर पडण्याचा कल वाढला आहे. परिणामी, काैटुंबिक न्यायालयांमध्ये घटस्फोट, पाेटगी व मुलांच्या पालकत्वाशी संबंधित प्रकरणांची संख्या वाढताना दिसत आहे.
दाम्पत्यांना समूपदेशनाची गरज
घटस्फोटाच्या वाढत्या आकडेवारीमुळे समाजातील बदलते नातेसंबंध आणि कुटुंबव्यवस्थेतील संक्रमण अधाेरेखित हाेत आहे. यावर उपाय म्हणून समुपदेशन, संवाद आणि कुटुंबव्यवस्थेची जाणीव वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीचा काैटुंबिक नातेसंबंधात मान-सन्मान राहत हाेता. मात्र, आता पती-पत्नी मिळून दाेघेच घटस्फोटाबाबत चर्चा करुन परस्पर ठरवित असल्याचे दिसून येत आहेत.
........
अनैतिक संबंधसुद्धा कारणीभूत
सध्याच्या पीढीत अनैतिक संबंधाला सर्वसामान्य मानल्या जाते. युवा वर्गात प्रेयसी किंवा प्रियकर असणे हे सामान्य असून ब्रेक-अपसुद्धा ते तेवढ्याच लवकर स्विकारतात. स्वच्छंद किंवा मर्जीप्रमाणे जगण्याची सवय असलेले युवक-युवती समाजातील विवाह संस्थेकडे गांभीर्याने बघत नाहीत. विवाह झाल्यानंतरही अनैतिक संबंध ठेवण्यास अनेकांना सामान्य वाटते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाल्यास थेट घटस्फोटापर्यंत प्रकरण पाेहचत असल्याचे समाेर आले आहे.
..........
पासपाेर्ट फोटाे घ्यावा
काैटुंबिक जबाबदारी सांभाळताना नवरा-बायकाेमध्ये सामंजस्य राहिले नाही. स्वाभिमान दुखावल्यामुळे पती-पत्नींमध्ये काैटुंबिक कलह वाढत आहे.married life divorce cases तसेच दाेघांच्या संसारात माहेर आणि सासरच्यांचा अतिहस्तक्षेपसुद्धा घटस्फोटासाठी कारणीभूत आहे. काैटुंबिक साैदार्ह टिकविण्यासाठी समजूतदारपणा आणि समूपदेशन ही काळाची गरज आहे.
- प्रेमलता पाटील (कुटुंब समूपदेशक)