धनगर समाजातर्फे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Dhangar Youth Association धनगर युवक मंडळ नागपूर, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ९.३० वाजता संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रमेश पाटील, अनिलकुमार ढोले, गणेशजी पावडे, दीपकजी अवताडे, उज्वल रोकडे, देविदास आगरकर, अशोक सांभारे, विलास डाखोळे, रामदास माहुरे, डॉ. हर्षा पाटील, नलिनी ढोक आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

nmo 
 
 
यानंतर धनगर युवक मंडळाच्या कार्यालयात जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देविदासजी आगरकर यांनी Dhangar Youth Association आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव करत त्यांनी सर्व समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, त्रिलोचन खरबडे, अशोक माहुरे, नामदेवराव खाटके, धनराज खरबडे, शशिकांत बुलकर, उज्वल रोकडे, लक्ष्मणराव रोकडे तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे,संपर्क मित्र