हिंगणघाट,
provide animal ambulances वेळीच उपचारासाठी पशुरुग्णवाहिकेच्या अभावामुळे मंगळवारी एका गोमातेला आपले प्राण गमवावे लागले. मानवाप्रमाणे जनावरांसाठी सुद्धा रुग्णवाहिका असती तर आज त्या गायीला वाचविण्यात यश आले असते, अशी प्रतिक्रीया व्यत केली जात आहे.एका गाईची प्रसूती झाली, पण दुर्दैवाने त्या बाळासोबतच तिचे संपूर्ण गर्भाशय बाहेर आले होते. ही गंभीर अवस्था होती. याबाबत माहिती मिळताच जीवरक्षक फाउंडेशनचे राकेश झाडे चमूसह घटनास्थळी दाखल झाले. शय ते सर्व प्रयत्न सुरू केले. गोमातेवर औषधोपचार करून तिचे गर्भाशय पुन्हा आत टाकण्यात आले. त्या वेदना ती शांतपणे सहन करत होती. पण, काही तासानंतर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली.
गर्भाशय परत बाहेर आले. दिवसभर हा प्रकार सुरूच राहिला. जीवरक्षक चमूसाठी हा अनुभव खूप वेगळा आणि धकादायक होता. सामान्यतः अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया यशस्वी होते किंवा इतर कारणांमुळे गाईचा मृत्यू होतो,हे अनुभवाअंती या जीवरक्षक फाउंडेशनच्या चमूला माहिती होती. आता ५०० किलो वजनाच्या या गोमातेला उचलून पशु रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पशु रुग्णवाहिकेची गरज होती. साधारण ५०० किलो वजन असलेल्या गाईला उचलणे हे अत्यंत कठीण काम आहे. मानवी शतीला मर्यादा असतात, अशावेळी यंत्रसामग्री आणि सुविधा अत्यावश्यक ठरतात. जर रुग्णवाहिका उपलब्ध असती तर गाईला योग्य स्थितीत उभं करून व्यवस्थित उपचार करता आले असते.
दिवसभर कडक उन्हात ती गाय तडफडत होती आणि जीवरक्षकची चमू असहाय्य होती. दिवसभरापासून तर रात्रीचे १२ पर्यंत अथक प्रयत्न करूनही ते गर्भाशय आत जात नव्हते. रात्रीचे १२ वाजले, अखेर सर्व उपाय थकले. सरतेशेवटी त्या गोमातेचा मृत्यू झाला. या कार्यास मदतीसाठी जीवरक्षक फाउंडेशनचे राकेश झाडे, स्वप्नील वाळके, ओम कापसे, ओम चाफले, चेतन गावंडे, भाविक कोपरकर, विराज कुंभारे, स्वरांश खापणे, परिसरातील सादिक शेख, पंकज काकडे यांनी अथक परिश्रम घेतले. परंतु, अपुर्या साधनांअभावी नुकत्याच जन्म दिलेल्या पाडसाला सोडून जाणार्या त्या गोमातेने वेदना असह्य होऊन आपले प्राण सोडले.
ही घटना फत एक उदाहरण नाही, तर एक प्रश्न आहे.provide animal ambulances रस्त्यावरच्या मुया प्राण्यांसाठी काम करणार्या संस्थांना आवश्यक सुविधा आणि मदत का मिळत नाही? शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा संस्थांना रुग्णवाहिका, वैद्यकीय साधने आणि आवश्यक निधी दिला गेल्यास अनेक निरपराध जीव वाचू शकतात, असेही यानिमित्ताने पुढे आले आहे