नागपूर,
dr-babasaheb-ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या संविधान चौकातील पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. रा. स्व.संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, सदर भाग ससंघचालक अनिल भारद्वाज, समरसता गतिविधी प्रांत टोली सदस्य संजय सराफ, समरसता गतिविधी संयोजक डॉ. सुधाकर इंगळे, समरसता सहसंयोजक डॉ. शंकर वानखेडे, समरसता गतिविधी भाग संयोजक राजेंद्र सायरे आदींसह विदर्भ प्रांत व नागपूर महानगरचे कार्यकारिणी सदस्य, सदर भागातील स्वयंसेवक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. नागपूरच्या सर्व वस्त्यांमध्ये असेच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.