नागपूर,
Dr. Babasaheb Ambedkar विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशीमबाग मैदानासमोर केशव द्वार परिसरात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पोलीस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, Dr. Babasaheb Ambedkar नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश हरडे व भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश कचकलवार यांच्या हस्ते नागरिकांना तरबूजाचे वाटप करण्यात आले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरला.यावेळी शिवकुमार पाटील, बबन सोमकुवर, प्रकाश फुले, असीद लहीतकर, विलास पाटील, राजेश लाखे, राजू भोयर तसेच रेशीमबाग व सिरसपेठ मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सौजन्य: राजेश हरडे ,संपर्क मित्र माफसू मध्ये आंबेडकर जयंती साजरी
नागपूर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माफसू, नागपूर येथे कास्ट्राईब कर्मचारी संघटना तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच विविध विभागांमध्येही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
सौजन्य : प्रवीण बागडे,संपर्क मित्र
रामेश्वरी येथे आंबेडकर जयंती उत्साहात
नागपूर :
परिकमल सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रामेश्वरी येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास भूपेंद्र (गोलू) बोरकर, प्रविण पाटील, अभय शंकरकर, सागर चौधरी, चंदू लांभे यांच्यासह मंतोष जेठवन, प्रमोद शिंदे, गणेश ठाकुर, सुनिल अस्वार, फूलदास पाटील, सचिन धोतरकर, सुभाष हातगाडे, अजय हाडके, जितू आलुवालिया, अलीभाई, सतीश कडू आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य : रमेश मेहर,संपर्क मित्र