‘त्या’ ड्रग्जतस्कर तरुणीचे देशभरात कनेक्शन

- दिल्लीतून आणले चार काेटींचे काेकेन

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
drug smuggler नागपुरातील अजनी रेल्वे स्टेशनवर डीआरआयने एका ड्रग्जतस्कर तरुणीला चार काेटी 26 लाख रुपये किंमतीचे काेकेन जप्त केले. ती तरुणी मूळची मुंबईची असून तिला दिल्लीतील रेल्वेस्थानकावर ड्रग्ज मािफयाने काेकेन पाेहचवले हाेते. काेकेन तिला बंगळुरु शहरात पाेहचवायचे हाेते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
 
 
drug smuggler
 
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआयची) मुंबई झाेनअंतर्गत नागपूर प्रादेशिक युनिटने (एनएआरयू) रविवारी अजनी रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 22692 हजरत निजामुद्दीन-केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस मधून ताब्यात घेतले हाेते. तिच्याकरवी काेकेनची तस्करी केली जात असल्याची टीप डीआरआयच्या नागपूर युनिटला मिळाली. नेहमीप्रमाणे ही गाडी रविवारी नागपूर स्थानकावर पाेहचताच गाडीतील एका संशयीत तरुणीला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता मेकअप किटमधील शॅम्पूच्या बाटलीत तब्बल पिवळ्या रंगाच्या 50 सीलबंद कॅप्सूल्स सापडल्या. या कॅप्सूल्समध्ये पांढèया रंगाचे पावडर स्वरूपात काेकेन लपवून हाेते.drug smuggler तिच्या जवळच्या साहित्याची तपासणी करून तब्बल 853 ग्रॅम काेकेन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या काेकेनची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे 4 काेटी 26 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी एका तरुणीला न्यायालयात हजर करण्यात आले. ती सध्या काेठडीत असून तिचे देशभर नेटवर्क असल्याची माहिती समाेर आली आहे. दिल्लीतून संपूर्ण देशभरात ड्रग्ज पाेहचविण्यासाठी त्या तरुणीचा ड्रग्जमािफया वापर करीत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
........