अभियंता रूपाली गोडंबेचा नाट्यक्षेत्रातही झेंडा

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
rupali-godambe : यवतमाळची रूपाली निर्मला अशोक गोडांबे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कार्पोरेट नोकरीसोबत नाट्यक्षेत्रात उत्कटतेने कार्यरत आहे. नुकतेच तिने पुण्यात प्रदीप वैद्य यांनी आयोजित केलेल्या ‘सोलो 6’ या नाट्यस्पर्धेत सहभाग घेतला आणि ‘लिसन हनी’ या इंग्रजी एकलनाट्यासाठी प्रथम क्रमांक पटकावला.
 
 
y15Apr-Rupali-Godambe
 
 
 
यासोबतच रूपालीला ‘सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन’ आणि ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ असे दोन वैयक्तिक पुरस्कारही मिळाले. हा सन्मान तिच्या नाट्यप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या यशाबद्दल तिला 20 हजार रुपये रोख पारितोषिक आणि आगामी प्रयोगांसाठी 30 हजार रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले. हे अनुदान अमेरिकास्थित ‘कला’ या संस्थेकडून देण्यात आले आहे.
 
 
येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडंबे यांची कन्या रूपाली गोडंबेचे लेखन, संगीत आणि अभिनय प्रामाणिकपणा आणि भावनिकतेमुळे प्रेक्षकांशी जोडले जाते. तिचे हे यश यवतमाळसाठी कौतुकाची बाब ठरली असून या यशाबद्दल तिचे विविध स्तरांवरून अभिनंदन केले जात आहे.