नाफेड खरेदी केंद्रात शेतकर्‍यांना येरझारा घालण्याची पाळी

हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिल

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
मानोरा,
nafed procurement center तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी नाफेड या संस्थेद्वारा नेमण्यात आलेल्या कृषी उत्पादक कंपनीद्वारा तांत्रिक कारणे दाखवून हरभरा खरेदी केली जात नसल्याने हरभरा खरेदी केव्हापासून सुरू होईल यासाठी रणरणत्या उन्हात खरेदी केंद्रावर येरझारा मारण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली आहे.
 

nafed procurement center 
 
 
प्रति शेतकरी दोन हेटरमधून केवळ १३ क्विंटल हरभर्‍याची खरेदी या केंद्रावरून घेण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त उत्पादन असलेल्या शेतकर्‍यांनी माल कुठे विकायचा हा प्रश्न आहे. बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत मागील दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकर्‍यांची हरभरा खरेदी उपरोक्त केंद्राकडून बंद आहे. सध्या उन्हाचा पारा ४४ अंशांवर गेला आहे. अशा रणरणत्या उन्हात शेतकरी सकाळपासून खरेदी केंद्रावर येऊन थांबत आहेत. मात्र आज सर्व्हर डाऊन आहे, बारदाना नाही, वरून आदेश नाही अशी कारणे देऊन त्यांना परत पाठवले जात आहे. घरात पडून असलेला हरभरा सांभाळणे, मजुरीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
 
फलकावर खरेदीचा हमीभाव ५८७५ रुपये प्रति क्विंटल दाखवला असला तरी प्रत्यक्षात खरेदी बंद असल्याने शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना ४५०० ते ४८०० रुपये दराने माल विकावा लागत आहे. यामुळे प्रति क्विंटल १००० रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागत आहे. तातडीने पुरेसा बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करावी.nafed procurement center प्रति शेतकरी १३ क्विंटलची मर्यादा वाढवून संपूर्ण उत्पादन खरेदी करावे अशी मागणी कारखेडचे शेतकरी गजानन जयराम पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 
खरेदी केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था करावी.
 या संदर्भात खरेदीदार संस्थेशी संपर्क साधला असता वरिष्ठ स्तरावरून सूचना येताच खरेदी सुरू करू’ असे मोघम उत्तर मिळाले. हमीभावाने खरेदीची केवळ घोषणा करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.