अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी?

अगरवेस भागात ऑटोत आढळला इसमाचा मृतदेह

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
अकोला,
first-victim-of-heatstroke : जुने शहरातील अगरवेस या भागात एका मालवाहू ऑटोमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या इसमाचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संबंधित इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
 
jk
 
 
 
अकोला शहरासह ग्रामीण भागाचे तापमान ४४ अंशाच्या वर गेले आहे.त्यामुळे जिल्ह्यात उष्माघाताचा धोका बडावला आहे. अशाच जुने शहरातील भागात एका मालवाहूमध्ये एका 35 ते 40 वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली गेल्या चार ते पाच दिवसांपासून उष्णतेची लाट जिल्ह्यात सुरू असताना शहराचे तापमान देखील वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.