बुलढाणा,
forest-fire : शहरातील क्रीडा संकुल परिसरात काल रात्री जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. वनविभागाच्या कर्मचार्यांनी जीवावर उदार होऊन ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बुलढाणा शहराला लागून अजिंठ्याच्या डोंगररांगा आहे. त्यामुळे काही वेळेला बुलढाणा शहरात बिबटे आणि अस्वलाचा वावर दिसून येत असतो. या जंगलात मोठ्या प्रमाणात इतर ही वन्यप्राणी वास्तव्यास आहे. दि. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरा नजीक असलेल्या जंगलाला आग लागल्याची घटना समोर आली. याबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांनी क्षणाचा ही विलंब न करता तिकडे धाव घेतली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते. कारण उन्हाळा असल्यामुळे सर्वत्र वाळलेला कचरा असल्याने आग पसरतच चाली होती. वनविभागाच्या १० कर्मचार्यांनी जीव धोयात घालून ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
दहा जणांना सुध्दा ती आग आटोयात येणार नव्हती एवढी भीषण आग लागलेली होती. परंतु वनविभागाचे धुरंधर दहा कर्मचारी मागे न हटता जीवावर उदार होऊन त्यांनी रात्री ११.२० वाजता आग विझवली. ही आग जर आटोयात आली नसती तर बुलढाण्या शेजारी असलेली वनराई जळून खाक झाली असती. आगीवर विझवण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या बहाद्दर कर्मचार्यांमध्ये प्रदीप मुंढे वनपाल बुलढाणा, गजानन शिंदे वनरक्षक हनवतखेड बिट, समाधान धोटे वनरक्षक बुलढाणा, कैलास चव्हाण मोताळा, रवी धनवटे मोताळा, रमेश चव्हाण मोताळा, वनमजूर पवन मुळे, रवींद्र तायडे, पवन गायकवाड, अंकुश गायकवाड वनमजूर यांचा समावेश आहे. एवढ्या रौद्ररूप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे. आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.