करुळ ग्रामपंचायत दोन वर्षापासून १५व्या वित्त आयोगाच्या निधीपासून वंचित

विकास खुंटला: कर वसुलीतून चालतो व्यवहार

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
समुद्रपूर,
karul gram panchayat शासनाकडून मिळणार्‍या १५ व्या वित्त आयोग योजनेच्या निधीतून गावातील विकासकामे केल्या जाते. मात्र, करुळ ग्रामपंचायतीला मागील दोन वर्षापासून निधीच प्राप्त झाला नसल्याने गावाचा विकास खुंटला आहे. सोबतच विविध प्रकारच्या कर वसुलीतून आर्थिक व्यवहार चालत असल्याचे पुढे आले आहे.
 
 
karul gram panchayat
 
 
शासनाकडून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी १५व्या वित्त आयोग योजना अमलात आणली असून या योजनेच्या माध्यमातून प्रतिव्यती ४९९ रुपये प्रमाणे ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर निधी वितरीत केला जाते. या निधीच्या माध्यमातून गावपातळीवर विकासाची कामे, पाणीपुरवठा, शाळा-अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयाचा विजेच्या बिलाचा भरणा, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाची कामे तसेच आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलचे वार्षिक शुल्क आदी कामे केली जाते. मात्र, करुळ ग्रामपंचायत या १५व्या वित्त आयोगाच्या निधीपासून दोन वर्षांपासून वंचित आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटला असून ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे.karul gram panchayat ग्रामपंचायतीचा आर्थिक कारभार गृहकर, पाणी पुरवठा कर यातून करावा लागतो आहे.
 
यासंबंधी सरपंच तथा सचिवांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावाही केला. तरी देखील अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे गावाचा विकास खुंटला असून याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर रखडलेला निधी ग्रामपंचायतीला द्यावा, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.