साकोली,
Little girl killed in Leopard attack in Sakoli साकोली तालुक्यातील उमरझरी परिसरात मागील महिना भरापासून एका वाघिणीने धुमाकूळ घातला असताना, आज बिबट्याच्या हल्यात एका 5 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. यामुळे बघिणींसह बिबट्याचाही संचार परिसरात होता असल्याचे समोर आले आहे. सदर घटना विर्शी गाव परिसरात घडली आहे. माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील सुहेला येथील काशिनाथ मिरी हे कुटुंबासह विर्शी येथील संजय कापगते यांच्या शेतात वीट भट्टीचे काम करण्यासाठी आले आहेत. शेतातच त्यांचे वास्तव्य आहे. आज पहाटे बिबट्याने काशिनाथ यांच्या 5 वर्षीय अंशिकावर हल्ला करून ओढत नेत ठार केले. या घटनेमुळे साकोली तालुका हादरला आहे.