पांजरा गोंडी येथे शेतातील घर आगीत खाक

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
farm-house-on-fire : तालुक्यातील पांजरा गोंडी येथे शेतकरी विजय साठे यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना आज १५ रोजी दुपारी घडली.
 
 
jkl
 
 
साठे यांच्या शेतात उभारलेल्या कच्च्या घराला दुपारी आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घरात साठवलेले धान्य, शेतीची अवजारे तसेच दैनंदिन वापरातील वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या.
 
 
 
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग अत्यंत भीषण असल्यामुळे ती नियंत्रणात येईपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच ग‘ाम महसूल अधिकारी आर. बी. शिराळे, मंडळ अधिकारी आर. पी. राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.