प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न : पंकजा मुंडे

*केळझर येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन तर सेलडोह येथे लोकार्पण *आपले सरकार सेवा केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
pankaja-munde : राज्यातील शेतकर्‍यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी उज्वला योजना, लाडकी बहीण, लखपती दिदी योजना, घरकुल यासारख्या योजना राबवून प्रत्येक नागरिक महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.यावेळी केळझर येथील सिद्धीविनायक मंदिरात पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
 
 
J
 
 
 
केळझर येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर येथे पशुचिकित्सालयाचे भूमिपूजन, सेलडोह येथील पशुचिकित्सालयाचे लोकार्पण, ग‘ामपंचायत येथील आपले सरकार सेवा केंद्राचे लोकार्पण व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध लाभाचे वाटप कार्यक‘मात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मु‘य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, माजी खासदार रामदास तडस, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसिलदार शंकुतला पाराजे आदी उपस्थित होते.
 
 
गरिबांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न असून प्रत्येकाला रोजगार देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. शासन राबवित असलेल्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून लाभ देण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विधानसभेत सुद्धा महिलांना आरक्षण देण्याचे नियोजन केले असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त सर्व प्रथम वर्धा जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात आला. हीच संकल्पना घेऊन राज्यात सेवा पंधरवाडा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. आता महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून प्रत्येक नागरिकांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविण्यासोबतच विविध योजनेचे लाभ देण्यात येत आहे. या अभियानामुळे हजारो नागरिकांना लाभ होत आहे. या लाभ वितरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केले.
 
 
जिल्हाधिकारी वान्मथी यांनी यांनी देखील मनोगत व्यत केले. महसूल विभागाच्या वतीने संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्याना अर्थसहाय्य, जात प्रमाणपत्र, विविध दाखले, कृषी विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना ट्रॅटरचे वितरण, मुलींना सायकल वितरण, दिव्यांगांना लाभाचे वितरण यासहा विविध योजनेचे लाभ व प्रमाणपत्र तसेच दाखले वितरण करण्यात आले. प्रास्ताविक तहसिलदार डॉ. शंकुतला पाराजे यांनी केले.