परतवाड्यात प्रथमच योगी पॅटर्न कारवाई

लैंगिक शोषण करणार्‍याच्या घरावर बुलडोजर

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
अचलपूर,
paratwada yogi pattern action अचलपूर व परतवाडा परिसरात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकरणातील प्रमुख आरोपी अयान अहमद तनविर अहमद याच्या परतवाडा स्थित घराचा अतीक्रमित भाग बुलडोजर कारवाई करत बुधवारी दुपारी पाडण्यात आला. यावेळी भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांच्यासह भाजपा नेते व नगर परीषद कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त होता.
 

परतवाड्यात प्रथमच योगी पॅटर्न कारवाई 
 
 
परतवाडा पोलिसांनी गटरमलपुरा येथील रहिवासी अयान अहमद तनविर अहमद यांच्यासह आणखी ३ आरोपींना अटक केली आहे. बुधवारी नगरपरिषद प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात सकाळी ११ वाजताच्या सुमारास आरोपीने अतिक्रमण करून बांधलेले शेड व जिना जेसीबी कारवाई करत पाडण्यात आला.paratwada yogi pattern action आरोपीचे संपूर्ण घर पाडणार अशी शक्याता होती. परंतु, तसे घडले नाही. यावेळी सुधीर रसे, अभय माथने, नगर पालिकेतील अनेक नगरसेवक, न. प. कर्मचारी, उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार, ठाणेदार सुरेश म्हस्के यांच्यासह मोठा पोलिस ताफा तैनात होता. त्या आरोपीच्या घरा लगतच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.