परतवाडा व अचलपूर कडकडीत बंद

हिंदू व मुस्लिम संघटनांचा सहभाग

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
अचलपूर, 
parthwada and achalpur closed परतवाडा शहरात घडलेल्या संताप जनक प्रकारामुळे सर्व धर्मीय व सर्व पक्षीय नागरिकांनी आणि व्यापारी संघटनांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. परिणामस्वरूप अचलपूर व परतवाड्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
 
 
परतवाडा व अचलपूर कडकडीत बंद
 
 
लैंगिक शोषण प्रकरणाने परतवाडा शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अचलपूर व परतवाडा बंदची हात देण्यात आली होती. मुस्लिम धर्मगुरू काझी साहेब यांनी देखील बंदची हाककेस प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते व उपविभाय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. वाघामाता संस्थान परतवाडा येथे मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांची, पदाधिकार्‍यांची व नागरिकांची बैठक झाली त्यात बंद पाळण्याचा निर्णय झाला होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता.parthwada and achalpur closed संपूर्ण शहर कडकडीत बंद होते. शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.