इंस्टाग्रामवर पाेलिसांची बदनामी
- युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
दिनांक :15-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
police defamation वाहतूक नियम ताेडणाऱ्याविरुद्ध कारवाई केल्याने संतापलेल्या दुचाकीचालकाने इन्स्टाग्रामवर पाेलिसांची बदनामी करणारी पाेस्ट केली. यासंदर्भात आराेपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई केल्यानंतर पाेलिसांनी लाच घेतल्याचा खाेटा आराेप करत आराेपीने साेशल मीडियावर दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित केला हाेता.
तक्रारदार राजेश राजेंद्र दुबे (46) हे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. 12 एप्रिल राेजी सायंकाळी सुमारे 4.45 वाजता ते शंकरनगर चाैकात वाहतूक कर्तव्यावर हाेते. एमएच 49 सीके 3715 या क्रमांकाचा बुलेट चालक वेगाने आला. त्याच्या बुलेटच्या सायलेंसरमधून कर्णकर्कश्श आवाज येत हाेता. दुबे यांनी संबंधित दुचाकीस्वाराला थांबवून सायलेंसरबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पाेलिसांनी त्याला 1,000 रुपयांचे अधिकृत चलान दिले. कारवाईदरम्यान संबंधित तरुण माेबाईलवर व्हिडिओ शूट करत हाेता. काही वेळातच त्या तरुणाने भुवांशू पराते नागपूर व्लाॅगर या इन्स्टाग्राम आयडीवरून व्हिडिओ पाेस्ट केला.police defamation पाेलिसांनी एक हजार रुपये घेतले आणि त्यातील 500 रुपये स्वतःकडे ठेवले असा आराेप त्यात केला. पाेलिसांच्या म्हणण्यानुसार, हा दावा पूर्णपणे खाेटा असून त्याद्वारे पाेलिस दलाची प्रतिमा मलीन करण्यात आली. या प्रकरणी पाेलिस दुबे यांच्या तक्रारीवरून आराेपी चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.