राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या वर्धेत

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
वर्धा,
draupadi-murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवार १६ रोजी वर्धा येथे येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या पृष्ठभूमीवर प्रशासन पूर्णतः सतर्क आहे. शिवाय सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर विशेष लक्ष दिले जात आहे.
 
 
 
murmu
 
 
 
राष्ट्रपती मुर्मु सेवाग्राम येथील बापूकुटी येथे भेट देतील. त्यानंतर त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ येथे होणार्‍या सहाव्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. सकाळी १०.५० वाजता त्यांचा ताफा सेवाग‘ाम आश्रमात पोहोचेल. ११.२५ वाजता हिंदी विद्यापीठात आगमन होईल. कार्यक्रमानंतर दुपारी त्यांचा ताफा नागपूरकडे रवाना होईल. या दौर्‍याच्या अनुषंगाने वर्धा आणि परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहे. सीमावर्ती भागातही विशेष तपासणी नाके उभारण्यात आले आहे. सेवाग्राम ते हिंदी विद्यापीठ मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
 
सुरक्षेच्या दृष्टीने १६ एप्रिलला ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँगग्लायडर यांसार‘या हवाई साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सेवाग‘ाम आणि वर्धा शहरातील काही प्रमुख मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. महिलाश्रम ते सेवाग्राम मार्ग आणि म्हसाळा बायपास हा मार्ग पूर्णतः बंद राहील. दत्तपूरहून नागपूरकडे जाणारा रस्ता तसेच महामार्गाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. नागपूरकडे जाणार्‍या वाहनांसाठी समृद्धी महामार्गाचा पर्याय उपलब्ध असेल. यवतमाळ-वर्धा-नागपूर मार्गावर तसेच नागपूर-वर्धा-यवतमाळ मार्गावर सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान २० मिनिटांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. सेवाग्राम मेडिकल चौक ते मांडगाव-पवनार मार्ग आणि हेलिपॅड ते बापूकुटी मार्गावरही काही वेळ वाहतूक थांबवण्यात येईल.