रायपूर,
property-registration-fee-discount : छत्तीसगढ सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेत मालमत्ता नोंदणी शुल्कात 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे महिलांना मालमत्ता खरेदी करताना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यात महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाला समान नागरी संहिता (युसीसी) लागू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि मालमत्तेतील त्यांचा सहभाग वाढवणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
या सवलतीमुळे महिलांच्या नावावर अधिकाधिक मालमत्ता नोंदवली जाईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षितता आणि स्वावलंबन वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे. तसेच, समाजातील लैंगिक समानतेला बळकटी देण्याचाही हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यात मालमत्ता व्यवहारांना गती मिळण्याची शक्यता असून, महिलांसाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय मानला जात आहे.