* वैद्यकीय महाविद्यालयानुसार रूग्ण वाढताहेत
* पण खासगी रुग्णालयात येणार्यांच्या नोंदीचे काय?
दिनांक :15-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
respiratory disease चंद्रपूर महानगर व परिसरात अनेक उद्योग आहेत. महाऔष्णिक वीज केंद्र आहे. तसेच मोठ्या संख्येत कोळसा खाणीदेखील आहे. या सार्यांमुळे हा परिसर प्रदुषणाचे माहेरघर बनले आहे. येथील जनतेत श्वसनाशी संबधित रोग वाढत आहे, अशी कबुली येथील वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रूग्णालयाने दिली आहे. पण त्यांची आकडेवारी केवळ हिमनगाचे टोक आहे. कारण खासगी रुग्णालयात जाणार्या श्वसन रोगींची नोंदच प्रशासनाकडे नाही!
येथील मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसनविकार विभागाने दिलेल्या मागील 3 वर्षाच्या माहितीनुसार, 2023 मध्ये दमा या आजाराचे 2005 रूग्ण होते. 2024 मध्ये 2288, तर 2025 मध्ये 2572 एवढ्या रुग्णांची नोंद झाली आहे. सीओपीडीचे (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) 2023 मध्ये 1672 रुग्ण, 2024 मध्ये 1896, तर 2025 मध्ये 1971 रुग्ण नोंदविण्यात आले आहे. श्वसन संक्रमणाचे 2023 मध्ये 3008, 2024 मध्ये 3404, तर 2025 मध्ये 3487 रुग्णांची नोंद झाली आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगचे 2023 मध्ये 167, 2014 मध्ये 181, तर 2025 मध्ये 172 रुग्ण नोंदविण्यात आले आहे. फुफुसाच्या आजाराचे 2023 मध्ये 657, 2024 मध्ये 608, तर 2025 मध्ये 667 रुग्ण होते. श्वसनलिकेचा दीर्घकालीन आजार ब्रोक्नियल अस्थामाचे 2023 मध्ये 657, 2024 मध्ये 608, तर 2025 मध्ये 667 रुग्ण नोदविण्यात आले आहेत.
प्रदुषणामुळेच रोग वाढताहेत हे सांगणे कठीण
श्वसन रुग्णांची संख्या वाढत आहे.respiratory disease परंतु, श्वसनाचे आजार हे धुम्रपान, क्षयरोग, संसर्ग तसेच प्रदूषण आदीमुळे होण्याची शक्यता असल्याने फक्त प्रदुषणामुळे ही रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगणे कठीण आहे, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्वसनरोग शास्त्र विभागाने व्यक्त केले आहे.