गोंदिया
agricultural land Gondiya गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा येथील पुंडलिक डोये या शेतकर्याचे एकत्रीकरणापुर्वीच्या जुन्या सातबारात गट क्र. ३३६ मध्ये १०.१४ हेक्टर आर शेतजमीन होती. त्यातच पुंडलिक डोये यांचे निधन व १९७०-७१ मध्ये झालेल्या एकत्रीकरणानंतर महसूल विभागाच्या दुर्लक्षाने गट बदलमधील सातबारात चक्क १.६२ हेक्टर आर जमीन कमी दाखविण्यात आली. त्यामुळे सदर जमीन गेली कुठे? असा प्रश्न डोये यांच्या कुटुंबीयांना पडला असून ती जमीन परत मिळावी यासाठी शेतकरी पुंडलीक डोये यांचा मुलगा कृष्णकुमार गेल्या दोन वर्षापासून संबंधित विभागाचे उंबरठे झिजवत आहे.
agricultural land Gondiya पालेवाडा येथील शेतकरी कृष्णकुमार पुंडलिक डोये यांच्या वडिलाच्या नावे असलेल्या गट क्र. ३३६ च्या सातबारावर १०.१४ आर शेतजमीन होती. मात्र, सन १९७१ मध्ये झालेल्या एकत्रीकरणातून नव्या गट क्रमांकाच्या ४१७ मध्ये फक्त ८.५२ हेक्टर आर शेजमिनीचा सातबारा तयार करण्यात आला. त्यामुळे १.६२ हेक्टर आर शेत जमीनच दस्ताऐवज मधून गायब झाल्याचे दिसून आले. या संदर्भात कृष्णकुमार डोये यांनी संबधित विभागाकडून कागदपत्रांची जुळवाजुळव केली. ज्यामध्ये जुन्या सातबारा व नव्या सातबारातील जमिनीच्या नोंदीची तफावत समोर आली. agricultural land Gondiya दरम्यान, कृष्णकुमार डोये महसूल विभागाकडे जमिनीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने धडपड सुरू केली. तर तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व त्यापुढे जावून उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्याची धडपड सुरू झाली. मात्र, दोन वर्षाचा काळ लोटूनही पिडीत शेतकर्याला न्याय मिळाला नाही. यावर कृष्णकुमार यांनी पत्र परिषदेच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणला असून डोये यांच्या मते सातबारावर कमी असलेली जमिन संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने कुटूंबातील तेजराम डोये व अमित डोये यांच्या ताब्यात गेली आहे. agricultural land Gondiya यंत्रणेच्या चुकीमुळे आपल्या मालकी हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली असून आगामी काळात कुटूंबासह आत्मदहन किंबहुना तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.