गुरुग्राम जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वढेरा यांच्या अडचणी वाढल्या

ईडीकडून आरोपपत्र दाखल

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Robert Vadra land scam सोनिया गांधी यांचे जावई आणि सुप्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वढेरा यांच्यावर गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वढेरा आणि त्यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एकूण ४३ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तेची एकूण किंमत ३७.६४ कोटी रुपये इतकी आहे.
 
robert 
Robert Vadra land scam या प्रकरणात ईडीने १७ जुलै २०२५ रोजी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात रॉबर्ट वढेरा यांच्यासह एकूण ११ व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यात सत्यानंद याजी, केवल सिंग विर्क तसेच ओंकारेश्वर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप आरोपपत्राची दखल घेतलेली नाही.
काय आहे प्रकरण?
Robert Vadra land scam २००८ मध्ये रॉबर्ट वढेरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीने गुरुग्रामच्या शिकोहपूर (सेक्टर ८३ ) गावात ३.५३ एकर जमीन केवळ ७.५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. या जमिनीवर कोणताही प्रकल्प पूर्ण न करता ती जमीन ५८ कोटी रुपयांना विकली गेल्याचा आरोप आहे. शिवाय, खोटी कागदपत्रे सादर करून ही खरेदी केल्याचे आणि वैयक्तिक प्रभाव वापरून व्यावसायिक परवाने मिळवल्याचा आरोपही वढेरा यांच्यावर आहे.
Robert Vadra land scam याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ईडीकडून चौकशी सुरू झाली. या प्रकरणात वढेरा यांची १८ तासांहून अधिक काळ चौकशीही करण्यात आली आहे. हे प्रकरण काँग्रेससाठीही राजकीयदृष्ट्या डोकेदुखी ठरू शकते. तथापि, न्यायालयाने एऊ ने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही, म्हणजेच या आरोपांवर खटला दाखल करायचा की नाही हे न्यायालयाने अद्याप ठरवलेले नाही.