सम्राट चौधरी ऍक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना कडक निर्देश जारी

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
पाटणा,
samrat-chaudhary : बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच प्रशासनाला वेग देण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि तातडीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
 

samrat-chaudhary 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट चौधरी यांनी अधिकाऱ्यांना कामकाजात गती आणण्याचे, जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी जलद करण्याचे तसेच कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. राज्यातील प्रशासन पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आणण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसत आहे.
 
नव्या सरकारच्या सुरुवातीलाच विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार असून, कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही, असा संदेश त्यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवण्यावर सरकारचा फोकस असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, त्यांच्या या जलद निर्णयक्षमतेमुळे प्रशासनात हालचाली वाढल्या असून, नव्या सरकारकडून बिहारमध्ये कामकाजाची गती वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.