शाळा, अंगणवाड्या आज बंद

तापमान ४५ अंश सेल्सिअस जाण्याची शयता

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
वर्धा
Temperature in Wardha नागपूर येथील वेधशाळेने गुरूवार १६ रोजी वर्धा जिल्ह्यात पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शयता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गुरूवार १६ रोजीला सर्व शाळा व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश काढले असल्याने जिल्ह्यातील १६२७ अंगणवाड्या आणि १४५४ शाळा बंद राहणार आहे.
 
wardha 
Temperature in Wardha मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवार १३ रोजी तापमान ४३.०१ सेल्सिअस, १४ रोजी ४३.०५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर आज बुधवार ४३.९ अंशवर जीवाची काहीली करणारी उन्ह कायम होती. नागपूर येथील वेधशाळेच्या वतीने गुरूवार १६ रोजीसाठी वर्धा जिल्ह्याला हिट अलर्ट देण्यात आला. हवामान विभागाच्या सूचना प्राप्त होताच जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून १६ रोजी जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्याचा निर्णय केला. तर नंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी गुरूवार १६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळाही बंद ठेवण्या बाबतचा आदेश पारित केला.
 
Temperature in Wardha उन्हात घराबाहेर पडू नये : डीएचओ डॉ. बेले
सध्या जिल्ह्याच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी उष्माघाताचा धोका जास्त असतो. गुरूवारी जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शयता हवामान विभागाच्या वतीने वर्तवित वर्धा जिल्ह्याला हिट अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी नागरिकांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडण्याचे टाळावे. शिवाय वाढत्या उन्हाच्या दिवसांत घरातील वृद्ध, छोट्या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. गुरूवारी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरच राहणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी सांगितले.
 
 
Temperature in Wardha३० एप्रिल १९९६ घेतल्या गेली होती सर्वाधिक तापमानाची नोंद
२०१६ : ४५.०० अंश सेल्सिअस
२०१७ : ४५.०२ अंश सेल्सिअस
२०१८ : ४५.०८ अंश सेल्सिअस
२०१९ : ४६.०० अंश सेल्सिअस
२०२० : ४२.०९ अंश सेल्सिअस
२०२१ : ४३.०४ अंश सेल्सिअस
२०२२ : ४५.०५ अंश सेल्सिअस
२०२३ : ४३.०० अंश सेल्सिअस
२०२४ : ४२.०५ अंश सेल्सिअस
२०२५ : ४४.०७ अंश सेल्सिअस