ऊस देयक उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना 15 टक्के व्याजासह रक्कम द्यावी : आ. किसन वानखेडे

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
kisan-wankhede : शेतकèयांच्या उसाच्या थकीत देयकांच्या प्रश्नावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, या भागातील शेतकèयांचा ऊस संबंधित साखर कारखान्यांनी नेला. परंतु उसाची देयके अद्याप रखडली आहेत. अशा अवस्थेत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कारखान्यांच्या सर्वच व्यवस्थापकांची आढावा बैठक बुधवार, 15 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरखेड येथे पार पडली. या बैठकीस आमदार किसन वानखेडे व उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उपस्थित होते. या बैठकीत आ. वानखेडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, साखर आयुक्तालयाच्या नियमानुसार उसाचे बिल ऊस कारखान्यांना दिला त्यानंतर 14 दिवसांत शेतकèयांच्या खात्यात रकमा जमा करणे बंधनकारक आहे.
 
 
y15Apr-Wankhede
 
 
 
त्या बाबतीत कायद्याचे उल्लंघन करणाèया कारखान्यांनी शेतकèयांना व्याज म्हणून 15 टक्के रक्कम द्यावी. तसे न झाल्यास कारवाईस पात्र ठरवावे, असा पावित्रा शेतकèयांच्या बाजूने ठोसपणे आ. किसन वानखेडे यांनी या बैठकीत घेतला.
 
 
मात्र गाळप हंगाम संपून दोन महिने उलटूनही अनेक शेतकèयांना पैसे मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कारखान्यांनी शेतकèयांबद्दल सकारात्मक भूमिका ठेवणे अत्यावश्यक आहे. या भागात शेतकèयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत याचेही भान त्यांना असणेही तेवढेच महत्वाचे ठरते असे आमदार म्हणाले.
 
 
बैठकीदरम्यान विविध साखर कारखान्यांच्या प्रलंबित देयकांचा आढावा घेण्यात आला तसेच कारखानदारांच्या अडचणी आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र, वसंत सहकारी साखर कारखाना चालवणाèया भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचा एकही प्रतिनिधी बैठकीस उपस्थित नसल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त केली.
 
 
एकूणच, शेतकèयांच्या हक्कांच्या पैशांसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असून, लवकरच थकीत देयकांबाबत ठोस कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पैनगंगा पात्रात शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडण्यात यावे अशाही सूचना बैठकीत प्रशासनास केल्या गेल्या.
 
 
या बैठकीला उस उत्पादक संघ अध्यक्ष डॉ. गणेश घोडेकर, नॅचरल शुगर कारखाना, सुभाष व शिऊर सहकारी साखर कारखाना, डेक्कन कारखाना यांचे प्रशासन अधिकारी उपस्थित होते. एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात शेतकèयांच्या खात्यात एफआरपीप्रमाणे रकमा जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.