स्वर्णलीला स्कूलचा दहावी निकाल 100 टक्के

सानिका कांबळे तालुक्यात अव्वल

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
swarnalila-schools : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवार, 15 एप्रिल रोजी दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला असून येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवत 100 टक्के निकालाची नोंद केली आहे. या निकालात सानिका विकास कांबळे हिने 98.8 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 

jlk 
 
 
 
यंदा शाळेतील एकूण 178 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सानिका कांबळे हिने 98.8 टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले असून ती डॉ. विकास कांबळे यांची कन्या आहे. आदित्य जितेंद्र कुशवाह याने 98.4 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
 
 
याशिवाय 29 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थापक डॉ. नरेंद्र रेड्डी, प्राचार्य अन्नपूर्णा, उपप्राचार्य विकी मोहनानी आणि सर्व शिक्षकांचे आभार मानले आहेत.