कारंजा (घा.) ,
theft-in-karanja : घरी कुणी नसल्याची संधी साधन अज्ञात चोरट्यांनी वॉर्ड १ बिहाडी रोड येथील संदेश बारई यांच्या घरी १४ रोजी दुपारी ४ वाजता सुमारास चोरी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संदेश बारई यांच्याकडे मरामाय मंदिरात भोजनाचा कार्यक‘म होता. त्यानिमित्ताने घरचे सर्व मंदिरामध्ये कार्यक‘माकरिता गेले होते. संदेश चोरी होण्याच्या दहा मिनिटांपूर्वीच घराला कुलूप लावून गेला होता. चार वाजताच्या सुमारास पुन्हा तो साहित्य नेण्यासाठी घरी आला असता त्याला घराचे गेट उघडे व कुलूप तोडलेले दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खुर्चीवर उभे होऊन सज्जा वरील पेटी काढली व त्यामधील साहित्य फेकले. डाळीचे डबे देखील पाहिले व जाताना समोरचे दार लावून पसार झाले. चोरट्यांनी सोन्याच्या दोन अंगठ्या, कानातले रिंग, रोख ७ हजार रुपये, एटीएम कार्ड व आधार कार्ड देखील नेले. तीन जण सकाळपासून एकाच दुचाकीवर फिरत होते आणि त्यांच्या घरावर लक्ष ठेवून होते. त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झाडाखाली ते बराच वेळ बसले असल्याचे अनेकांनी पाहिले. तिघेही तोंडाला दुपट्टा बांधून होते. चोरी करून ते बिहाडी रस्त्याने गावामध्येच पसार
झाल्याचे सांगण्यात येते.