अर्धवट कामामुळे सेलूकरांचा जीव मेटाकुटीला!

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
सेलू, 
unfinished-work-sellu : शहराला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर केली. मात्र, अंमलबजावणी आणि संथ गतीमुळे ही योजना आता नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
 
 

J 
 
 
बोरधरणातून सेलू शहरात पाणी आणण्यासाठी संपूर्ण जलवाहिणी टाकण्याचे काम सुरू असले तरी शहरातील मुख्य मार्गांवर दीड महिन्यांपासून अर्धवट खोदकाम करून काम बंद अवस्थेत आहे. विशेषतः मेडिकल चौक ते मटन मार्केट आणि घोराडकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर खोदलेली नाली नागरिकांसाठी संकट बनली आहे. या अर्धवट कामामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत असून दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पादचारींना जीव धोयात घालून मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
 
 
नगरपंचायत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही समस्या सोडवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
यासंदर्भात नगरपंचायत सेलूचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, ते काम स्थानिक मजुरांऐवजी परप्रांतातील मजुरांकडून केले जात आहे. काही दिवसांपूर्वी हे मजूर गावाला गेल्यामुळे काम तात्पुरते बंद पडले आहे. मात्र, पुढील १० ते १२ दिवसांत काम पुन्हा सुरू करून समस्या मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.