अर्जुनी मोरगाव
Wild elephants Arjuni Morgaon अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्ती बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा मोठा हैदोस वाढला असून हे वन्यप्राणी जिवीत हाणीसह मका, धान, व अन्य पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. त्यामुळे संपुर्ण तालुकाच आता भयग्रस्त जीवन जगत असून भय इथले संपत नाही असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
Wild elephants Arjuni Morgaon अर्जुनी मोरगाव तालुका घनदाट जंगलाने वेढलेला असून जंगलातील सरपन व शिकारीचे प्रमाण नसल्यातच जमा असल्याने हिंस्त्र वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तालुक्यात ३० ते ३५ संख्या असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने धुडगूस माजवलेला आहे. गेल्या एक दिड महिन्याभरांपासून गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या या रानटी हत्तीच्या कळपाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा हत्तीचा कळप वडेगाव/ बंध्या, खोळदा, पुष्पनगर व कशोरी जंगल परिसर व जवळूनच वाहत असलेल्या गाढवी नदीच्या सभोवतालच रहात असताना या परिसरातील शकडो एकर शेतातील पिके उध्वस्त केली आहे. त्यातच या हत्तीच्या कळपाने आता वडेगाव केशोरी परिसरातुन आपला मोर्चा आता तालुकास्थळापासून दहा ते पंधरा कि.मी अंतरावरील बाराभाटी, बोळदे, कवठा या परीसराकडे वळविला आहे. Wild elephants Arjuni Morgaon विशेष म्हणजे, या हत्तीच्या कळपाने १४ एफ्रिल च्या रात्री बाराभाटी बोळदे परिसरातील किशोर येरणे यांचे शेतातील मकापिकाची मोठी नासधुस केली आहे. तर कैलास येरणे, नारायण येरणे, चरणदास जोशी, मारोती साऊसकार यांचेही शेतातील मका पिकांची मोठ्या प्रमाणात नासधुस केली आहे. Wild elephants Arjuni Morgaon हाती आलेले मका पिक हत्तींनी नासधुस केल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. त्यातच दुसरीकडे बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचाही उच्छाद वाढला असून तालुक्यातील धाबेटेकडी येथील एका मुलाला बिबट्याने ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे तालुक्यात वन्यप्राण्यांची भिती निर्माण झाली असून हत्तीच्या कळपाला कायमस्वरुपी हाकलुन लावण्यात व इतर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभागाची यंत्रणाच कमजोर पडत असल्याचे दिसून येत आहे.