फाशी घेऊन युवकाची आत्महत्या

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
youth-commits-suicide : तालुक्यातील लाठी (बेसा) येथे कवडू पांडुरंग खोके (वय 40, लाठी-बेसा) या युवकाने शेतात झाडाला गळफास घेऊन बुधवार, 15 एप्रिलला आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पहाटे 4 ते 5 च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

jkl 
 
 
 
ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ शिरपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. कवडू खोके यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे लाठी परिसरात शोककळा पसरली आहे.