यवतमाळ,
10th CBSE Result केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी आभासी पद्धतीने जाहीर करण्यात आला आला. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले यात यवतमाळचे जवाहरलाल दर्डा इंग्लिश मिडियम स्कूल, घाटंजी येथील जवाहर नवोदय विद्यालय, वणी येथील मॅक‘ुन अकॅडमी, पांढरकवडा येथील गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. अन्य शाळांनीही उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली आहे. या निकालामध्ये मुलांपेक्षा मुलींचीच सरशी झाल्याचे दिसून आले.
यवतमाळ येथील केेंद्रीय विद्यालयाचा निकाल ९७.६७ टक्के ४३ विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर यवतमाळ येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सचा निकाल ९९.३ टक्के लागला. १८८ पैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांवर गुण प्राप्त केले. पोदार स्कूलने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. ३१ विद्यार्थी ९९ टक्क्यांपेक्ष़ा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले. ९५ टक्क्यांपेक्षा जास्त घेऊन नऊ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी मिळविली. यवतमाळ येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सचा विद्यार्थी शार्दुल सुरेश साखरवाडे याने दहावीच्या परीक्षेत ९४.८ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आईच्या आजारपणाच्या कठीण परिस्थितीतही शार्दुलने चिकाटी व जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले आहे.
10th CBSE Result आपल्या यशाचे श्रेेय शादुर्र्लने शाळेच्या मु‘याध्यापक रिना काळे, तसेच आपल्या आई सुषमा साखरवाडे आणि वडील यांना दिले आहे. त्याच्या या यशामुळे कुटुंब व स्कूल ऑफ स्कॉलर्सचा गौरव वाढला आहे. येथील सेंट अलॉयशियस इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी शौनक आनंद गंजीवाले याने दहावीच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शौनक हा गंजीवाले कॉमर्स अकॅडमीचे संचालक प्रा. गंजीवाले व अॅड. मानसी गंजीवाले यांचा सुपुत्र आहे. त्याने इंग‘जीत १०० पैकी १०० आणि संस्कृत विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. भविष्यात एमबीए करण्याचे उद्दिष्ट ठेवून शौनकने पुढील शिक्षणासाठी कॉमर्स शाखा निवडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या यशाचे श्रेय शौनकने आपले आई-वडील, काकू प्रा. मंजिरी तसेच सर्व शिक्षकांना दिले आहे.