इराण चर्चांवरून अमेरिकेवर ठपका; हुथी नेत्याचा थेट आरोप

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
दुबई,
abdul-malik-al-houthi : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येमेनमधील हुथी बंडखोरांचा प्रमुख अब्दुल मलिक अल-हुथी यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये अमेरिका “अस्वीकार्य आणि अशक्य अटी” ठेवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 

huthi 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्हिडिओ संदेशात हुथी नेत्याने म्हटले की, कोणत्याही स्वतंत्र देशाने अशा अटी स्वीकारणे शक्य नाही. त्यामुळेच इराणसोबतच्या चर्चांमध्ये प्रगती होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
त्यांनी पुढे असेही सांगितले की, सध्या लागू असलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम हा अमेरिका आणि इस्रायल यांच्या अपयशाचे परिणाम आहे. त्यांच्या मते, दोन्ही देशांना युद्धात अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धविरामाचा मार्ग स्वीकारावा लागला.
 
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अद्याप कायम असून, अणु कार्यक्रम आणि प्रादेशिक वर्चस्व यांसारख्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये मतभेद तीव्र आहेत. या पार्श्वभूमीवर हौथी गटाने उघडपणे अमेरिकेवर टीका केल्याने मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.