मोटर सायकल रॅली व शोभा यात्रेचे ही आयोजन
बुलढाणा,
Bhagawan Parshuram Jayanti भगवान परशुराम जयंती निमित्त बुलढाणा येथे भगवान परशुराम भवनाचे भव्य लोकार्पण सोहळा तसेच सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य मोटर सायकल रॅली तसेच सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान परशुराम जयंती निमित्त रविवार दि. १९ एप्रिल रोजी बुलढाणा येथील महावीर नगर या ठिकाणी भव्य परशुराम भवनाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन स्थानिक आ. संजय गायकवाड व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा बुलढाणा नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Bhagawan Parshuram Jayanti लोकार्पण सोहळा महावीर नगर या ठिकाणी रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी बुलढाणा नगर परिषदेचे नगरसेवक तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या सोहळ्यासाठी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे यासोबतच भगवान परशुराम जयंतीनिमित्त सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही मोटर सायकल रॅली सकाळी ७.३० वाजता स्थानिक राम मंदिर येथून प्रारंभ होणार असून ही मोटरसायकल रॅली कारंजा चौक तहसील चौक बाजीप्रभू देशपांडे स्मारक भगवान परशुराम चौक गजानन महाराज मंदिर चौक चिंचोले चौक सर्युलर रोड मार्गे महावीर नगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या भगवान परशुराम भवन या ठिकाणी या मोटर सायकल रॅलीचा समारोप होणार आहे तसेच सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही शोभायात्रा बाजीप्रभू देशपांडे स्मारक , भगवान परशुराम चौक, सावरकर चौक ,गजानन महाराज मंदिर चौक या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करून राधा गोविंद मंगल कार्यालय या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप होणार आहे या तीनही कार्यक्रमासाठी सकल ब्राह्मण समाज व समस्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भगवान परशुराम जयंती उत्सव समिती तथा सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.