बाबासाहेबांच्या कार्यामुळेच प्रेरणाभूमीचे निर्माण कार्य : भक्तराज महाराज

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मानोरा, 
तालुयातील कारखेडा येथे गावातील बस स्थानक परिसर मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत च्या वतीने प्रेरणाभुमी उभारण्यात आलेले हे कार्य बाबासाहेबाना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत भाजपाचे युवा नेते Bhaktaraj Maharaj भक्तराज महाराज राठोड यांनी लोकार्पण प्रसंगी केले.
 
 
maharaj
 
Bhaktaraj Maharaj  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखेड चे माजी उपसरपंच अशोक किसन ढोले होते, तर प्रमुख उपस्थिती मानोरा पोलिस स्टेशनच्या ठाणेदार नैना पोहेकर, सहकार नेते सुरेश गावंडे, गावच्या सरपंच सोनाली बबन देशमुख, उपसरपंच अनिल काजळे, ग्रामपंचायत सदस्य मनोज तायडे, रामतीर्थ चे सरपंच धनराज सोनटक्के, माधुरी कांबळे, सुभाष कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यस्तरीय दलित वस्ती मधून बांधण्यात आलेल्या डॉटर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा भूमी चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू पंचशील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश बाळू जाधव, प्रास्ताविक पोलिस पाटील वासुदेव सोनोने, आभार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक समीर देशमुख यांनी मानले. यावेळी बहुसंख्य महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.