मुंबईत भोंदूबाबा गजाआड

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Bhondubaba Gajaad in Mumbai मुंबईतील मालाड परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारावर पोलिसांनी कारवाई करत रिदम पांचाळ नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेत अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आठवड्यातील विशिष्ट दिवशी भूतबाधा काढण्याच्या नावाखाली विधी करत असे. या कृतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला तो आपल्या घराजवळ अशा प्रकारचे कार्यक्रम करत होता, मात्र काही दिवसांपूर्वी त्याने महापालिकेच्या उद्यानात मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करून सार्वजनिक ठिकाणीच असे विधी केल्याचे समोर आले आहे.
 
 
अरेस्ट
 
या प्रकारांचे छायाचित्रे आणि चित्रफिती स्थानिकांनी जमा करून पोलिसांकडे सादर केल्या होत्या. तसेच नागरिकांनी एकत्र येत स्वाक्षऱ्या करून अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित कायद्यांनुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. वारंवार सूचना देऊनही संबंधित व्यक्ती आपले कृत्य थांबवत नसल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.या व्यक्तीकडून करण्यात येणाऱ्या विधींमध्ये वापरले जाणारे साहित्य आणि पद्धती पाहून अनेकांना शंका निर्माण झाली होती. मात्र तो स्वतः हे सर्व धार्मिक विधी असल्याचे सांगत होता. तरीही स्थानिकांनी याविरोधात ठाम भूमिका घेत कारवाईची मागणी कायम ठेवली.