'भुल भुलैय्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मुंबई
Bhul Bhulaiyya तब्बल 53 वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि125 नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी ‘भुल भुलैय्या’ या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाचे निर्माते असलेले केदार सामंत आणि रणजीत देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून ‘बाबा वर्दम थिएटर्स’ या हौशी नाट्य संस्थेशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. ही संस्था 54 वर्षांपासून हौशी व प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दोघेही गेली 28 वर्षे नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत. राज्यभरातील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी मिळावी या हेतूने त्यांनी ‘श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स’ची स्थापना केली. केदार सामंत यांनी 13 नाटके, 6 बालनाट्ये आणि 6 एकांकिकांचे दिग्दर्शन केले असून अनेक नाटकांत अभिनय व तांत्रिक बाजू सांभाळली आहे. रणजीत देसाई यांनी नाटकांचे व्यवस्थापन आणि नाट्य महोत्सवांचे आयोजन केले आहे.
 

Bhul Bhulaiyya Marathi play, 
‘नाटकाची कथा ऐकल्यानंतरच हे नाटक करण्याचा मी निर्णय घेतल्याचे कुमार सोहोनी सांगतात. कथेत असा वेगळा गाभा होता की त्यावर नाटक होऊ शकतं, हे स्पष्ट जाणवलं आणि त्यामुळेच हा प्रयोग करण्याचं ठरवलं’. या नाटकाचा फॉर्म पारंपरिक चौकटींपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. विज्ञान, Bhul Bhulaiyya वास्तुशास्त्र आणि तंत्र-मंत्र या तीनही घटकांच्या साह्याने ‘आत्म्याचा शोध’ घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे नाटक केवळ फॅण्टसी नसून एक सखोल आणि विचारप्रवर्तक शोधयात्रा आहे.