मुंबई
Swapnasundari movie तरुणाईचा लाडका अभिनेता भूषण प्रधान याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सेव्ह द डेट’ अशी एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पोस्टमधील रोमँटिक फोटो आणि एंगेजमेंट रिंगमुळे अनेकांनी तो लग्नबंधनात अडकणार का? लग्नाची तारीख जाहीर केली का? असे प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेचा उलगडा झाला असून त्याचा नवीन चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले असून त्यामध्ये भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात एका निवांत ठिकाणी बसलेली ही जोडी, एकमेकांच्या सहवासात हरवलेली दिसते. सायली पाटील पारंपरिक वेशात अत्यंत मोहक दिसत असून, Swapnasundari movie भूषण प्रधान तिच्याकडे प्रेमाने पाहाताना दिसतो. पोस्टरमधील संपूर्ण मांडणी एक स्वप्नवत आणि भावनांनी भरलेला अनुभव देणारी आहे. रेडबेल मीडिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी केले आहे.