बुलढाणा,
CBSE 10th Result स्थानिक सहकार विद्या मंदिर सीबीएसई मान्यता प्राप्त निवासी व अनिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभुतपुर्व यशासह दहावीच्या परिक्षेत यश मिळविले. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विद्यार्थी अत्यंत उत्कष्ट गुणांसह यशस्वी झाले आहेत. या यशाने सहकार विद्या मंदिरने विद्यार्थ्यांवर घेतलेल्या कठोर परिश्रम व सर्वांगीण विकासावर मोहोर उमटवली.

CBSE 10th Result यावर्षी सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधुन चि. पार्थ तायडे याने ९७.०० टक्के मिळवित विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळविला तर दुसरा क्रमांकावर चि. हरीओम खरात ने ९६.८० मिळविले व कु. आर्या वर्हाडे व चि. स्वरीत खाकरे यांनी ९६.६० गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला. तर चतुर्थ क्रमांकवार चि. कार्तिक राऊत व कु. गार्गी ढवळे ९६.४० आणि पाचव्या क्रमांकावर कु. हर्षिता रिंढे हिने ९६.२०% गुण प्राप्त करीत यश मिळविले. अभिमानास्पद बाब म्हणजे ३५० विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थ्यानी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले तसेच १८९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर एकूण ७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे इंग्रजी ०२, गणित ०१, सोशल सायन्स ०१, आय. टी १७, मराठी १२ असे एकुण ३३ विद्यार्थ्यांनी वरील विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवित विक्रम रचला. या यशाबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, संस्थेच्या अध्यक्षा कोमल सुकेश झंवर, प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.