मुंबई
Dhurandhar 2 आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत कौतुक करू लागले. परंतु या चित्रपटाच्या यशाबाबत काही लोकांमध्ये संभ्रम होता. इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांना वाटत होते की, पहिल्या वीकेंडनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकणार नाही, असा खुलासा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने केला आहे. परंतु रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ने त्या सर्वांना चुकीचे ठरवले . पहिल्या सोमवारपासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गती पकडली आणि जगभरात त्याने कमाईचे अनेक विक्रम रचले.
‘धुरंधर 2’ला नव्हता इंडस्ट्रीचा पाठिंबा
दिग्दर्शक कुणाल Dhurandhar 2 कोहलीने खुलासा केला की, सुरुवातीला बॉलिवूड इंडस्ट्रीने या चित्रपटाला पाठिंबा दिला नव्हता. “इंडस्ट्रीने एखाद्या चित्रपटाला पाठिंबा दिला नाही तरीही तो हिट होऊ शकतो. धुरंधरला अजिबात पाठिंबा मिळाला नव्हता. मी ज्या ज्या मोठ्या दिग्दर्शकांशी बोललो, त्या सर्वांनी सांगितले होते की हा चित्रपट सोमवारीच थांबेल. पण त्याउलट सोमावरी चित्रपटाने आणखी वेग धरला होता”, असे कुणाल म्हणाला. ‘धुरंधर 2’ने पहिल्याच दिवशी तब्बल 102.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर पहिल्या सोमवारी 65 कोटी रुपये कमावले होते.