तहसील परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मानोरा, 
Encroachment in tehsil area शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात स्थायी आणि अस्थाई अतिक्रमणाचे पेव मागील काही वर्षांपासून फुटलेले असून, अतिक्रमण हटविण्याचे काम ज्यांच्याकडे आहे त्याच कार्यालयाला अतिक्रमणकर्त्यांनी विळखा घातल्याने व शासकीय इमारतींवर बेकायदेशीर विज मीटर बसवण्यापर्यंत खाजगी लोकांची मजल गेली असल्याच्या विरोधात १६ एप्रिलपासून उपरोक्त अंसंवैधानिक बाबी हटविण्याच्या मागणीसाठी धीरज राठोड महाराज यांनी उपोषणास्त्र बाहेर काढले आहे.
 
 
uposhtn
 
Encroachment in tehsil area  शहर व तालुयातील नागरिकांच्या महसुली दावे निकाल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळावे यासाठी तहसील कार्यालय परिसरामध्ये परवाना धारक अर्जनवीस (स्टॅम्प वाईंडर) असतात. मात्र, मानोरा तहसील कार्यालय परिसरामध्ये काही वाईंडर यांनी शासनाकडून निर्मित अर्जनवीसांसाठी असलेल्या इमारतीमध्ये बेकायदेशीर वीज मीटर बसवून शासकीय नियम व निकषांची राजरोसपणे पायमल्ली चालविलेली आहे. शासकीय परिसरातील इमारतीमध्ये खाजगी लोकांनी अवैध पणे घेतलेले वीज कनेशन तातडीने तोडण्यात यावे. सरकारी इमारतीमध्ये ज्या लोकांना शासनाकडून कुठलीही परवानगी नाही, अशा लोकांना बेदखल करण्यात यावे आणि तहसील कार्यालय परिसरामध्ये असलेले स्थायी अस्थाई अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या मागणीसाठी धीरज राठोड यांच्यावतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. रमेश महाराज उर्फ फकीर बाबा सह राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी या उपोषणाला आज भेट दिली.