बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी ठप्प

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
नाफेडच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका
चार दिवसांपासून खरेदी बंद

उमरखेड, 
Farmers: Kharif season तालुक्यात खरेदी विक्री संघाच्या केंद्रात नाफेड पणन संघाद्वारे हरभरा खरेदी सुरू आहे. आतापर्यंत 11 हजार क्विंटल खरेदी झाली आहे. मात्र बारदाणा अभावी चार दिवसांपासून खरेदी बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी व्यापाऱ्यांना हरभरा विकावा लागत आहे. बारदाणा ऐनवेळी संपल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
 
 
bardana
 
Farmers: Kharif season  शासनाचा हमी भाव 5,875 रुपये आहे. नाफेडद्वारे हरभरा खरेदी चालू असताना अचानक बारदाना संपल्याने खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीडनाशके खरेदी करावी लागतात. शेतीची मशागत चालू आहे. त्यातच लाखो रुपयांचा माल शेतकऱ्यांना हमी भावाऐवजी कमी भावाने विकावा लागत आहे. पणन महासंघाने तत्काळ बारदाणा उपलब्ध करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.