३ लाखांचे नुकसान
समुद्रपूर,
Fire: Farmer's loss तालुयातील खंडाळा येथील शेतात असलेल्या गोठ्याला अचानक लाग लागली. आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण करून संपुर्ण गोठ्याची राख रांगोळी केली. या आगीत २० ते २५ विंटल कापूस, जनावरांचा चारा, शेतीचे साहित्य जळून राख झाल्याने शेतकर्याचे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.
Fire: Farmer's loss मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार १६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी अभय निनावे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण गोठ्याला कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोयात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग आटोयात येईपर्यंत गोठ्यात असलेले स्प्रिंकलर पाईप, २० ते २५ विंटल कापूस, स्प्रे पंप, जनावरांचा चारा, शेती साहित्य जळून खाक झाले. यामध्ये शेतकर्याचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या तांडवामुळे अभय निनावे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी अभय निनावे यांनी केली आहे.