मार्डी व नवरगाव ग्रामपंचायतमध्ये चुरस

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीकडे तालुकावासींचे लक्ष

मारेगाव, 
Gram Panchayat by-election मारेगाव पंचायत समिती अंतर्गत चार ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये फक्त सहाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. यात केवळ दोनच ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात आले असल्याने या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीचा सामना होणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्याचा सोमवार, 13 एप्रिल हा शेवटचा दिवस होता. या दिवशी केवळ दोनच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात आले. तर दोन ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी एकही नामांकन दाखल आलेले नाही.
 
 
gram
 
Gram Panchayat by-election  नामांकन दाखल झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये मार्डी व नवरगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अर्जच न आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये हटवांजरी तथा बुरांडा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मार्डी येथील प्रभाग 3 मध्ये उपसरपंचांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी माधुरी अंकुश गुरनुले व मनीषा प्रशांत नागपुरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. नवरगाव ग्रामपंचायतसाठी प्रभाग 1 मधून सुरेश नथ्थू डवरे व हर्षल शंकर शेंडे यांनी आणि प्रभाग 3 मधून सुरेश नथ्थू डवरे व संकेत गणेश डवरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या पोटनिवडणुकीसाठी तीन जागांसाठी सहाच उमेदवार असल्याने थेट लढत होणार आहे. छाननीतून उमेदवारी कायम असलेल्या इच्छुकांना शुक्रवार, 17 एप्रिलला दुपारी 3 पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट असेल.