२५ कोटींच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन
वर्धा,
आमचे सरकार केवळ योजना जाहीर करत नाही तर ग्रामीण तरुणांना आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करीत आहे. ग्रामीण युवक व महिलांना काम देणारा उद्योजक बनवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यत केला. सालोड (हिरापूर) येथे गोट मार्केट यार्ड, परिवहन विभागाच्या कार्यालयाची संरक्षण भिंत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध विकास कामांच्या २५ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. राजेश बकाणे, माजी खासदार रामदास तडस, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, सालोडचे सरपंच अमोल कन्नाके, उपसरपंच आशिष कुचेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, जिप बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, देवळी नपचे उपाध्यक्ष राहुल चोपडा आदी उपस्थित होते.
गोट मार्केट यार्डमुळे वर्धा जिल्ह्यात आता वेगवेगळ्या जातींच्या शेळ्या-मेंढ्यांचे संशोधन आणि प्रदर्शन होईल. यासाठी मोठे लस्टर तयार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात गवळाऊ जातीच्या गाईंचे संवर्धन करणार्या गवळी समाजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. या जातीच्या गाईंची संख्या आणि दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी आम्ही सर्व मिळून विशेष प्रयत्न करणार आहोत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. प्रास्ताविक आशिष कुचेवार यांनी केले तर संचलन पल्लवी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्यंने महिला उपस्थित होत्या.
गोट मार्केट यार्ड संकल्पना मॉडेल योजना ठरू शकते : पालकमंत्री भोयर
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar गोट मार्केट यार्ड ही संकल्पना ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारी ठरणार असल्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. सालोडचा हा प्रकल्प राज्यातील इतर भागांसाठी ‘मॉडेल योजना’ ठरू शकतो. सालोडमधील युवकांनी नवीन प्रयोग करून गोट मार्केट यार्डला जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर नेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. २०१५ सालोड हे मोठे गाव दत्तक घेऊन ते आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. निधीअभावी अनेकांनी लहान गावांची निवड केली असताना सालोडच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याचे ना. डॉ. भोयर यांनी नमूद केले.