दोन तास वाहतूक ठप्प
वणी,
Illegal coal transportation वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (वेकोली) वणी उत्तर भागामध्ये सुरू असलेल्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, या जीवघेण्या वाहतुकीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कोळसा वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी केली. या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या कारवाईमुळे २ तास कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
तपासणीदरम्यान वणी परिसरात धावणारी अनेक कोळशाची वाहने मोटार वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले. अनेक वाहने तांत्रिकदृष्ट्या अनफिट असून भंगार अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोडिंग होत असल्याचेही आले. या प्रकाराकडे स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप इरशाद खान यांनी केला. आरटीओ अधिकारी व कोळसा वाहतूकदार यांच्यातील आर्थिक हितसंबंधांमुळेच नियमभंग करणार्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
Illegal coal transportation या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये तीव‘ नाराजी आहे. तीव‘ता लक्षात घेता वेकोलीच्या उपविभाग व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मनसेने उघड केलेल्या या प्रकारानंतर संबंधित दोषी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वेकोली प्रशासनाने मुदत मागितली आहे. प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर मनसेकडून अधिक तीव‘ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.