Illegal sand smugglers रेती तस्करीत पकडलेला व तहसील कार्यालयात उभा असलेला ट्रक नेमका कोणी जाळला याबाबत कळंब परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. ट्रक जाळण्याची ही घटना बुधवार, 15 एप्रिलच्या मध्यरात्री घडली. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा होत असताना तरुण भारतने मोठ्या प्रमाणात या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्याची दखल घेत कळंबचे तहसीलदार धीरज स्थूल यांनी धडक मोहीम राबवली. यावेळी रेती तस्करांच्या मोठ्या प्रमाणात मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले.
Illegal sand smugglers यात ट्रक क्रमांक एमएच29 बी1396 हा अंकुश गायगोले याच्या मालकीचा ट्रक 3 ब्रास रेतीसह पकडला होता. जप्त करण्यात आलेला ट्रक तहसील कार्यालयात उभा होता. काही अज्ञातांनी या ट्रकला 15 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर पेटवले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उभ्या असलेल्या या ट्रकला अचानक आग लागली की कोणी पेटवले, याच्या चौकशीकरिता महसूल प्रशासनाने पोलिस प्रशासनाला तक्रार दिली आहे.