समता सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Kamala Nehru College- कमला नेहरू महाविद्यालयात ‘समता सप्ताहा’निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन अमर सेवा मंडळाच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
 
sayali
 
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आदी विषयांवर प्रभावी मांडणी केली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून झाली. Kamala Nehru College प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी समता ही प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना सकारात्मक बदलासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सुचेता पारकर व प्रा. टेमदेव बन्सोड यांनी काम पाहिले.शेवटी विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:सायली लाखे /पिदळी ,संपर्क मित्र